Judges 17

1एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात एक माणूस होता; त्याचे नाव मीखा. 2आणि त्याने आपल्या आईला म्हटले, जी अकराशे शेकेल रुप्याची नाणी तुझ्याजवळून घेतली गेली होती, आणि ज्यामुळे तू शाप उच्चारला होता, आणि तो मी ऐकला! पाहा ती रुप्याची नाणी माझ्याजवळ आहेत; मीच ती चोरून घेतली होती. त्याची आई म्हणाली, माझ्या मुला, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो!

3मग त्याने ती अकराशे शेकेल रुपे आपल्या आईला परत दिली; तेव्हा त्याच्या आईने म्हटले, मी माझ्या मुलासाठी कोरीव लाकडी मूर्ति व ओतीव धातूची मूर्ति करण्यासाठी आपल्या हाताने हे रुपे परमेश्वराला अर्पण म्हणून वेगळी करते. तर आता मी ही तुला परत देते. 4त्याने ती रुप्याची नाणी आपल्या आईला परत दिली. मग त्याच्या आईने दोनशे शेकेल रुपे घेऊन ते सोनाराला दिली, आणि त्याने त्याची कोरीव व ओतीव मूर्ति केली. नंतर ती मीखाच्या घरी ठेवली.

5मीखा ह्या माणसाचे एक मूर्तीचे देवघर होते, आणि त्याने याजकाचे एफोद व कुलदेवता केल्या होत्या; आणखी त्याने आपल्या एका मुलाचे याजक म्हणून समर्पण केले होते. 6त्या दिवसांत इस्राएलावर कोणी राजा नव्हता; प्रत्येकाने आपापल्या दिसण्यांत जे योग्य, ते केले.

7तेव्हा यहूदातील बेथलेहेमातला यहूदी घराण्यातला तरुण लेवी तेथे आपले कर्तव्य पार पाडत राहत होता. 8नंतर तो माणूस यहूदातल्या बेथलेहेम नगरांतून निघाला, आपल्याला राहण्यास कोठे जागा मिळेल ते शोधू लागला. प्रवास करत एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आला. 9मग मीखा त्याला म्हणाला, तू कोठून आलास? तेव्हा तो माणूस त्याला म्हणाला, मी बेथलेहेमतला यहूदी लेवी आहे; आणि मला राहण्यासाठी जागा मिळावी म्हणून मी प्रवास करत आहे.

10तेव्हा मीखा त्याला म्हणाला, तू माझ्याबरोबर राहा आणि माझा सल्लागार व याजक असा हो. म्हणजे मी तुला प्रती वर्षी दहा रुप्याची नाणी (तुकडे) व एक पोशाख व तुझे अन्न देईन. मग तो लेवी आत गेला. 11तो लेवी त्या माणसाबरोबर राहण्यास तयार झाला, आणि तो तरुण त्याच्याजवळ त्याच्या एका पुत्रासारखा झाला.

12आणि मीखाने त्या लेवीला पवित्र कर्तव्य करण्यास वेगळे केले, आणि तो तरुण त्याचा याजक झाला आणि तो मीखाच्या घरी राहिला. नंतर मीखा बोलला, आता मला कळले की, परमेश्वर माझे चांगले करील, कारण हा लेवी माझा याजक झाला आहे.

13

Copyright information for MarULB